_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune News : मुंबईत हायकोर्टातातून थेट पुणे पालिकेच्या हेल्पलाईनवर फोन , आणि घडलं असं

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर दिलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करत मुंबईत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर वाईट व्यवस्थापना बाबतीत पुणे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नंबरवर हायकोर्टानं कोर्टातून थेट कॉल लावला. तर वेबसाईटवर पाच व्हेंटिलेटर बेड असूनही, हेल्पलाईनवरील महिलेनं बेड उपलब्ध नसल्याचं फोनवर सांगितलं.

_MPC_DIR_MPU_II

पुणे महापालिकेचं व्यवस्थापन कोर्टात उघड पडल्याने अशा पद्धतीनं फोनकरून खातरजमा करणं योग्य नाही. हेल्पलाईनवर काम करणारी व्यक्ती डॉक्टर नसते, अशी पुणे महापालिकेने हायकोर्टात सारवासारव केली. दरम्यान महापालिकेने सर्व फोन ऑपरेटर्सना ट्रेनिंग देणार असल्याचं कोर्टात सांगितलं आहे.

त्यावर मुख्य न्यायाधीश सी. जे. दत्ता म्हणाले की पुढच्या वेळीही फोन लावून अशीच खातरजमा करु.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.