Pune News: ट्रॅव्हल्स मॅनेजरकडून पाच हजाराची लाच स्विकारताना पोलिस कर्मचारी रंगेहाथ जाळ्यात

एमपीसी न्यूज: पुणे ते सोलापूर मार्गावरील खासगी ट्रॅव्हल्स वर कारवाई न करण्यासाठी सहा हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारताना एका पोलिस शिपायाला संजय पकडण्यात आले. लोणी काळभोर येथील टोल नाक्याजवळ शनिवारी ही कारवाई करण्यात आली. सुहास भास्कर हजारे (वय 27) असे कारवाई करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे एका ट्रॅव्हल एजन्सी मध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांचा एजन्सीच्या बसेस स्वारगेट पुणे ते सोलापूर या मार्गावर वाहतूक करतात. या मार्गावर धावणार्‍या बस वर कारवाई न करण्यासाठी पोलीस शिपाई सुहास हजारे यांनी दर महिना सहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्याची तक्रार त्यांनी लाचलुचपत विभागाला दिली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत विभागाने लोणी काळभोर येथील टोलनाक्याजवळ सापळा रचला होता. त्यानंतर त्यांना लोकसेवक सुहास हजारे हा पाच हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात सापडला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.