Pune News : राजा नातू करंडक नाटिका स्पर्धेला सुरुवात

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली राजा नातू करंडक आंतरशालेय नाटिका स्पर्धेला आज (दि. 17) उत्साही वातावरणा (Pune News)सुरुवात झाली. स्पर्धेचे यंदाचे पहिले वर्ष असून स्पर्धेत 23 शाळांचे संघ सहभागी झाले आहेत. भरत नाट्य मंदिरात आयोजित केलेली स्पर्धा 22 जानेवारी पर्यंत  सुरू असणार आहे.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनंत निघोजकरचिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाईमिलिंद सबनीसमंगेश शिंदेराजाभाऊ नांगरेअश्विनी वाघयोगेश जाधवकनक महाजन (Pune News)आदी उपस्थित होते.

Metro News : पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे काम सुरू व्हावे; ‘पीसीसीएफ’ने घेतली राज ठाकरे यांची भेट

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या महाराष्ट्रीय कलोपासकने प्राथमिक गटातील नाटिका स्पर्धा ते पुरुषोत्तम करंडक या दोन स्पर्धांमधील दुवा साधला जावा या उद्देशाने यंदाच्या वर्षीपासून माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी नाटिका स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कै. राजाभाऊ नातू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘राजा नातू करंडक’ अशा नावाने ही स्पर्धा संबोधली जाणार आहे.

चाकण येथील जॉयस इंग्लिश मिडियम स्कूलने सादर केलेल्या ‘कूकूऽऽच कूऽ‘ या नाटिकेने स्पर्धेला सुरुवात झाली. पुढील स्पर्धा गुरुवार (दि. 19)शुक्रवार (दि. 20) आणि शनिवारी (दि. 21) दुपारी 1 आणि सायंकाळी 5 अशा दोन सत्रात तर रविवारी (दि. 22) दुपारी 1 वाजता स्पर्धा आयोजित करण्यात (Pune News)आली आहे.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारदि. 27 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी श्याम जोशी असणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.