Pune News : सौरभ गाडगीळ यांचा आरटीआय कडून “पुणे आयकॉन” म्हणून सन्मान

एमपीसी न्यूज – राउंड टेबल इंडिया (आरटीआय) ही गैर राजनैतिक व सांप्रदायिक तत्वावर कार्य करणाऱ्या तरुण सदस्यांची संस्था आहे. या सदस्यांचे उद्दीष्ट आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्य, सेवा, फेलोशिप, समाजकार्य आणि सत्कार्यास प्रोत्साहन देणे.

प्रा. एस. बी. मुजुमदार आणि अतुल चोरडिया यांना जागतिक स्तरावर त्यांच्या योगदानासाठी सन्मानित केले गेल्यानंतर , आज राऊंड टेबल इंडिया चॅप्टर 177 ने सौरभ गाडगीळ यांना “पुण्याचे आयकॉन ” म्हणून गौरविले व त्यांचा सत्कार केला.

यावेळी बोलताना आरटीआय- पीएसआरटी -177 चे चेअरमन रिषू बावेजा म्हणाले की, “सौरभ गाडगीळ यांनी भारताबाहेर, संयुक्त अरब अमिराती तसेच युनायटेड स्टेट्समध्ये व्यवसायाला सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँडमध्ये रूपांतरित करण्याचे श्रेय दिले गेले आहे. राउंड टेबल इंडिया, त्यांचा जागतिक स्तरावरील विस्तार आणि समाजसेवेच्या प्रशंसनीय योगदानाबद्दल “पुण्याचे आयकॉन” म्हणून अभिमानाने सन्मान करतो. ”

नव्या उद्येशापर्यंत पोहोचण्यासाठी, मानवतेच्या कल्याण आणि उन्नतीत मदत करण्यासाठी पुण्याचे नवे आयकॉन सौरभ गाडगीळ यांनी राउंड टेबल इंडियाकडे इच्छा व्यक्त केली आहे, आणि या संदर्भातील प्रयत्नांवर चर्चा केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.