Pune News : शहर पोलीस दलातील वरीष्ठ निरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू

एमपीसी न्यूज – कर्तव्य निभावताना कोरोना झालेल्या शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बाजीराव मुळे (वय 51) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुणे शहर पोलीस दलातील 14 कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

बाजीराव मुळे हे येरवडा वाहतूक विभागात कार्यरत होते त्यांनी कोरोना लसीचा पहिला डोसही घेतला होता. 10 एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरु असतानाच त्यांना न्यूमोनिया आणि कावीळची लागणही झाली होती. अशातच उपचार सुरू असता ची तब्बेत खालावली आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.