Pune News :अभियांत्रीकी दुसऱ्या वर्षाच्या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलाव्यात म्हणून विद्यार्थ्यांचे पुणे विद्यापीठात आंदोलन 

एमपीसी न्यूज – अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या व शेवटच्या सत्रातील परिक्षांच्या ज्या तारखा जाहीर झाल्या आहेत त्यामध्ये विद्यार्थांचा विचार न करता, त्यांना पूर्व तयारीला कोणताही वेळ न देता त्या जाहीर कऱण्यात आल्या आहेत, असा आरोप करत त्या तारखा त्वरीत बदलाव्यात अशी मागणी अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांनी केली. यासाठी आज (दि.23) त्यांनी सकाळी (Pune News)थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये  आंदोलन केले.

यामध्ये अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांसह पुणे जिल्हा शहर विद्यार्थी काँग्रेस यांच्या पदाधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाच्या (SE) विद्य़ार्थ्यांच्या पहिल्या सत्राच्या (INSEM)   आणि शेवटच्या सत्राच्या (ENDSEM) परिक्षांमधील कालावधी वाढवावा तसेच आत्ता घेण्यात (Pune News)येणाऱ्या शेवटच्या सत्राच्या (ENDSEM) परिक्षा पुढे ढकलाव्यात अशा दोन प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांनी मांडल्या आहेत.

Moshi Crime News : कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा.

याविषयी एमपीसी न्यूज शी बोलताना विद्यार्थ्यांनी सांगितले की, 20 डिसेंबरला पुणे विद्यापीठामार्फत पहिल्या सत्राच्या(INSEM)  चे परीक्षा वेळापत्रक देण्यात आले.यात पहिले 2 भागांवर आधारित परीक्षा घेतली जाते . 26 डिसेंबर पासून प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचे  आयोजन करण्यात आले होते.

नंतर काही कारणास्तव  पहिल्या सत्राच्या  (INSEM )परीक्षा पुढे ढकलण्यात आली व प्रात्यक्षिक परीक्षा आहे त्याच दिवशी घेण्यात आली. तसेच  पहिल्या सत्राची परीक्षा पुढे ढकलत ती 16 जानेवारी ते 20 जानेवारी मध्ये घेणार असे जाहिर केले. तसेच शेवटच्या सत्राची  परिक्षा 25 जानेवारी पासून घेणार असे वेळापत्रक देण्यात आले. एवढ्या कमी वेळात आम्ही विद्यार्थी कसा अभ्यास करणार. तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना(Pune News) फक्त चार दिवसांचा कालावधी दिला आहे. तसेच परीक्षांमध्ये जास्त दिवसांचा फरकही नाही. त्यामुळे परिक्षांच्या तारा पुढे ढकलाव्यात जेणे करून विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळेल, यासाठी हे आंदोलन करत असल्याचे ही विद्यार्थ्यांनी सांगितले.

यावर विद्यापीठ प्रशासनाने चर्चेअंती तोडगा काढू असे आश्वासन दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.