Nigdi News : पाईपालईनच्या व्हॉलमधून येत आहे फेसयुक्त पाणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Nigdi News) पाण्याच्या पाईपालईनच्या व्हॉलमधून फेसयुक्त पाणी येत असल्याचे समोर आले आहे.

महापालिका पवना नदीतून रावेत बंधा-यांतून पाणी उचलते. निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन पाणीपुरवठा केला जातो. पवना नदी अतिशय प्रदुषित झाली आहे. निगडी, प्राधिकरणातील जानकीबन गणपती मंदिर समोरील पाणी पुरवठा विभागाच्या व्हॉलमधून फेसयुक्त पाणी बाहेर येत आहे. नागरिकांना रसायनयुक्त पाण्याच्या पुरवठा होता का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Moshi Crime News : कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा

पाणीपुरवठा (Nigdi News) विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे म्हणाले, नेमके कशामुळे व्हॉलमधून फेसयुक्त पाणी येते हे पाहिले जाईल. तसे पाणी येत असेल तर दुरुस्ती केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.