Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत घवघवीत यश

एमपीसी न्यूज : सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनच्या (Alandi) वतीने घेण्यात आलेल्या गणित ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. या ज्ञान ऑलिम्पियाडद्वारे विद्यार्थ्यांच्या तरुण मनांना प्रेरणा देण्याबरोबर गणित सारख्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, अवघड वाटणाऱ्या संकल्पना सरळ व सोप्या वाटाव्यात यासाठी विविध उपक्रमांच्या व स्पर्धा परीक्षेमार्फत प्रयत्न केले जातात.

या ऑलिम्पियाड स्पर्धेत श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील इयत्ता पाचवी ते सातवीचे एकूण 45 विद्यार्थी लेवल एकसाठी प्रविष्ट झाले होते. यापैकी इयत्ता पाचवीतील श्वेता सूर्यवंशी, श्रीशा कदम, श्रीनिधी पाटील तसेच इयत्ता सहावीतील अनिशा शिंदे, राधिका फपाळ, संस्कृती नवले तर इयत्ता सातवीतील पूजा बाबर, अनुष्का तापकिर, यश टोणपे हे नऊ विद्यार्थी गोल्ड मेडलसाठी प्रविष्ट झाले.

Nigdi News : पाईपालईनच्या व्हॉलमधून येत आहे फेसयुक्त पाणी

तसेच त्यातील श्वेता सूर्यवंशी, अनिशा शिंदे व पूजा बाबर या तीन (Alandi) विद्यार्थ्यांची लेवल 2 साठी निवड झाली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सूर्यकांत मुंगसे तसेच संदीप वालकोळी यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, विश्वस्त प्रकाश काळे, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे यांनी संस्थेच्या व विद्यालयाच्या सर्व घटकांच्या वतीने कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.