Pune News : सीएसआयआर, केपीआयटी यांच्या हायड्रोजन इंधन सेल कारची चाचणी

एमपीसी न्यूज – हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातील पहिल्या कारची वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि केपीआयटीने यांच्या वतीने चाचणी घेण्यात आली.

पुण्यातील सीएसआयआर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा याठिकाणी हि चाचणी पार पडली. हायड्रोजन इंधन सेल हे कमी तापमानावरील पीईएम (प्रोटोन एक्सचेंज मेम्ब्रान) प्रकारचा इंधन सेल असून, 65-75 डिग्री सेंटीग्रेड तापमानापर्यंत वाहनांच्या वापरासाठी योग्य असल्याचे सांगितले जात आहे.

सीएसआयआरच्या ‘कृतीतून ज्ञान’ या कार्यक्रमावर आधारीत सीएसआयआर आणि केपीआयटी यांनी 10 किलो वॅट इलेक्ट्रिक क्षमतेचे स्वयंचलित श्रेणीची एलटी पीईएमएफसी इंधन सेल विकसित केलं आहे.

केपीआयटीने स्टॅक अभियांत्रिकीत नवीन कौशल्य विकसित केले आहे. ज्यामध्ये हलक्या वजनाचे धातू, द्विध्रुवी प्लेट आणि गॅस्केट डिझाइन, बॅलेन्स ऑफ प्लान्ट (बीओपी), सिस्टम इंटिग्रेशन, कंट्रोल सॉफ्टवेयर आणि इलेक्ट्रिक पॉवर ट्रेन जे इंधन सेल वाहन चालविण्यासाठी सक्षम ठरते.

_MPC_DIR_MPU_II

इंधन सेल स्टॅकसह नंतर विकसित केलेल्या (रेट्रोफिटेड) बॅटरी-इलेक्ट्रिक पॅसेंजर कार प्लॅटफॉर्मवर चाचण्या करण्यात आल्या. हे तंत्रज्ञान बस आणि ट्रक यासारख्या वाहतूक वाहनांना अधिक अनुकूल ठरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. अपेक्षित ऑपरेटिंग श्रेणी मिळविण्यासाठी बॅटरी इलेक्ट्रिक बस/ ट्रकना मोठ्या बॅटरीची आवश्यकता असते. या तुलनेत एचएफसी तंत्रज्ञानासाठी मोठ्या ऑपरेटींग श्रेणीसाठी लहान बॅटरीची आवश्यक असते. म्हणून एचएफसी तंत्रज्ञान व्यावसायिक वाहनांसाठी अधिक अनुकूल आहे.

एफसी वाहनांमध्ये टाईप – तीन हायड्रोजन टाकी बसविण्यात आली आहे. ज्याची क्षमता 1.75 किलोग्रॅम हायड्रोजन तर 350 बार एवढं प्रेशर आहे. एफसी वाहन 60 ते 65 प्रति तास वेगाने रस्त्यावर धावू शकेल.

याविषयी माहिती देताना केपीआयटीचे अध्यक्ष रवी पंडित म्हणाले, तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे देशी तंत्रज्ञान पूर्वीपेक्षा अधिक सक्षम असल्यामुळे अधिक व्यवसायिक दृष्टिकोनातून विचार होत आहे. देशातील प्रदूषण आणि इंधन आयात कमी करण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे असल्याचे पंडित म्हणाले.

सीएसआयआर एनसीएलचे संचालक अश्विनीकुमार नांगिया म्हणाले, सीएसआयआर एनएमआयटीएलआय अंतर्गत ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूकीला यश आले आहे. देशातील वाहतुकीसाठी हायड्रोजनवर आधारित ऊर्जेचा इंधन म्हणून वापर करण्याची वेळ आली आहे. यामुळे केवळ पेट्रोल, डिझेल आयातीचा खर्च कमी होणार आहे. हायड्रोजन हे एकमेव स्वच्छ इंधन आहे ज्याचं उपउत्पादन हे केवळ पाणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.