Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक अखेर जाहीर

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे (Pune News) विद्यापीठातील विविध विभागांच्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 2023-24 मधील पहिले सत्र 21 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. वेळापत्रक जाहीर होण्यास यावर्षी विलंब झाल्यानेविदयार्थी व महाविद्यालयांचे लक्ष त्याकडे लागले होते.

कोरोनानंतर शैक्षणिक संस्थांमधील शैक्षणिक वर्ष हे पूर्ववत होण्यासाठी पावले उचलण्यात यावीत, अशा सूचना राज्य सरकारने केल्या आहेत, परंतु यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune News) सातत्याने मागे पडत होते. अखेर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला विद्यापीठाने हे वेळापत्रक जाहीर केले आहे.वेळापत्रकानुसार विद्यापीठाचे पहिले सत्र 21 ऑगस्ट ते 16 डिसेंबर दरम्यान, तर दुसरे सत्र 1 जानेवारी ते 18 मे या कालावधीत होईल, अशी माहिती विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात दिली आहे.

Maharashtra News : खुशखबर! राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील 19 हजार 460 पदांची मेगा भरती

असे असेल शैक्षणिक वर्ष –

  • पहिले सत्र – 21 ऑगस्ट ते 16 डिसेंबर
  • दुसरे सत्र – 1 जानेवारी ते 18 मे 2024
  • हिवाळी सुटी – 18 ते 30 डिसेंबर
  • उन्हाळी सुटी – 19 मे ते 30 जून 2024

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.