Talegaon Dabhade : रोटरी सिटीची अष्टविनायक दर्शन यात्रा

एमपीसी न्यूज – अधिक मासानिमित्त रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) सिटीची अष्टविनायक दर्शन यात्रा नुकतीच संपन्न झाली. रोटरी सभासद, ॲन्स,ॲनेटस 50 सभासदांनी या यात्रेत सहभाग घेतला. या यात्रेत महिलांची संख्या अधिक होती.

तीन वर्षातून येणारा अधिक मास हा महिना आपल्या भारतीय संस्कृतीत अतिशय पवित्र मानला जातो, या महिन्याची पुरूषोत्तम मास म्हणून विशेष ओळख!

या महिन्याला पौराणिक महत्त्व आहे अधिक मास महिन्यात दानाधिक कर्मांना विशेष महत्त्व आहे. अनेक लोक देवदर्शन, तीर्थयात्रा, व्रतवैकल्य, पोथी वाचन करतात. या महिन्यात केलेले दान, देवदर्शन आणि पूजा यांचे फळ अधिक प्रमाणात मिळते असे म्हणतात म्हणून या महिन्याचे महत्त्व आहे.

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक अखेर जाहीर

अधिक मासानिमित्त रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) सिटीची अष्टविनायक दर्शन यात्रा नुकतीच संपन्न झाली रोटरी सभासद, ॲन्स,ॲनेटस 50 सभासदांनी या यात्रेत सहभाग घेतला.

संस्थापक विलास काळोखे, अध्यक्ष सुरेश शेंडे, ट्रेनर दिलीप पारेख, सेक्रेटरी भगवान शिंदे प्रकल्प प्रमुख संजय मेहता, ॲडमिन संजय वाघमारे, संतोष शेळके या सर्वांच्या नियोजन आयोजन आणि अथक परिश्रमातून अष्टविनायक यात्रा विनासायास पार पडली

यात्रेचे नियोजन अतिशय सुटसुटीत आणि आनंददायी होते पहिल्या दिवशी मोरगाव सिद्धटेक थेऊर रांजणगाव व ओझर या पाच ठिकाणी गणपती दर्शन झाले अतिशय सुंदर रीतीने आयोजन केले प्रदीप टेकवडे, प्रशांत ताये, संगीता शिरसाट, रघुनाथ कश्यप, रितेश फाकटकर, सुरेश दाभाडे (Talegaon Dabhade), वर्षा खर्गे, संजय वाघमारे, सूर्यकांत म्हाळसकर, सुनील महाजन,तानाजी मराठे, रामनाथ कलावडे, नवनाथ म्हसे,आनंद पूर्णपात्रे,संतोष सातकर, नितीन शहा,मनोज राठोड, विश्वास कदम व सर्वांनीच सांस्कृतिक कार्यक्रम गाण्याच्या भेंड्या अशा विविध कार्यक्रमांनी यात्रेची रंगत वाढवली.

आयोजकांनी चहा नाश्ता जेवण याची उत्तम व्यवस्था केली होती रोटरी क्लबला गणपती बाप्पाची आरती करण्याचा मान मिळाला. ओझर या ठिकाणी मुक्काम केल्यानंतर दुसरे दिवशी लेण्याद्री पाली व महड या ठिकाणी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. रात्री चिंचवड येथे गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन यात्रेची सांगता झाली.

दोन दिवस सर्व सभासद भक्तिमय वातावरणात दंग झाले होते. महिलांचा उत्साह आणि सहभाग वाखाणण्याजोगा होता. सर्वांना दोन दिवस घरादाराची आठवण सुद्धा झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.