Talegaon Dabhade : विविध उपक्रमांनी होणार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता

एमपीसी न्यूज – संपूर्ण देशभर सन 2022-2023 हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले. या वर्षाची सांगता विविध उपक्रमांनी केली जाणार आहे. हर घर तिरंगा, मेरी मिट्टी मेरा देश तसेच स्थानिक शहीद वीरांच्या नावे शिलाफलक उभारणी असे उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी दिली.

केंद्रीय कॅबिनेट सचिव यांचे सूचनाद्वारे आझादी का अमृतमहोत्सव या कार्यक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांच्या सांगता समारंभानिमित्त दिनांक 13 ते 15 ऑगस्ट ‘हर घर झेंडा’ हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी एन.के.पाटील यांनी दिली.

तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये झालेल्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे, कल्याणी लाडे, सुवर्णा काळे, कार्यालयीन अधीक्षक रवींद्र काळोखे, शीतल जाधव आदी उपस्थित होते.

दि 9 ते 14 ऑगस्ट पर्यंत “मेरी मिट्टी मेरा देश” (मिट्टी को नमन विरोंको वंदन) या आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या धर्तीवर अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभानिमित्त अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमानुसार गाव ते शहरापर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी याबाबत अभियान घेण्यात येणार आहे.

यामध्ये शिलाफलक उभारणी, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक व विरांना वंदन, पंचप्राण शपथ तसेच ध्वजारोहण अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.

यावेळी प्रस्ताविक उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी केले, मनोगत, मार्गदर्शन मुख्याधिकारी एन. के. पाटील, प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे यांनी केले तर स्वागत, आभार सुवर्णा काळे यांनी मानले.

या उपक्रमांपैकी शिलाफलक उभारणीकरिता स्थानिक शहीद वीरांची नावे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीने आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी,देशाच्या संरक्षणासाठी, शांततेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले असेल अशा आर्मी, नेव्ही, वायू दल, राज्य पोलीस दल इ. मधील सर्व व्यक्तींची नावे सोमवार दि 7 ऑगस्ट 2023 पर्यंत नगरपरिषद कार्यालयास (Talegaon Dabhade) लेखी स्वरुपात कळवावी, असे आवाहन मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.