Pune crime News : वॉकिंग करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – वॉकिंग करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावून चोरुन नेले. हि घटना शुक्रवारी ( दि.18) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास रेणूका माता मंदिर केशवनगर, पुणे येथे घडली.

याप्रकरणी 48 वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या आपल्या मैत्रीणी सोबत वॉकिंग करीत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी महिलेच्या गळ्यातील 80 हजार किंमतीचे मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.