Pimpri news: पिंपरीतील त्रिलोक स्मशानभूमीचे लवकरच नुतनीकरण

पावणेचार कोटी खर्च होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरीतील त्रिलोक स्मशानभूमीचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी पावणेचार कोटी रूपये खर्च होणार आहे.

पिंपरीतील डिलक्स चौकात त्रिलोक स्मशानभूमी आहे. महापालिकेतर्फे या स्मशानभूमीचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या.

त्यानुसार, अंबिका कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 9.99 टक्के कमी दराने निविदा सादर केली.

रॉयल्टी चार्जेस 1 लाख 14 हजार आणि मटेरीयल टेस्टींग चार्जेसपोटी 1 लाख 48 हजार रूपये असे एकूण 3 कोटी 67 लाख रूपये खर्च होणार आहे. महापालिका प्रशासनाने या कामांची निविदा स्विकारण्यास मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.