Pune News : …ही तर विरोधीपक्षाची स्टंटबाजी : महापौर मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज : ऑनलाइन जीबीसाठी सर्वपक्षीय गटनेत्यांना विश्वासात घेतले होते. परंतु अचानक महापौर दालनात येऊन गोंधळ घालत आंदोलन करणे ही निव्वळ स्टंटबाजी आहे, अशी टीका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत केली.

दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या महापौर दालनातील गोंधळावर सभागृह नेते गणेश बीडकर म्हणाले, ही मुख्य सभा होणे आवश्यक होते. जाहिरात दिली गेली होती, त्यामुळे ते ठिकाण बदलता येत नाही. राज्य सरकारचे वैधानिक आणि स्थायी समित्यांनाच ऑनलाइन सभा घेण्याचे आदेश आहेत. परंतु केवळ एका सभेपुरता हा निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पत्र काल मिळाले.

_MPC_DIR_MPU_II

यावर महापौर मोहोळ म्हणाले, महापौर दालनात गोंधळ घालत जे वर्तन विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी केले ते चुकीचे होते. वस्तुस्थिती वास्तव माहित असताना ही स्टंटबाजी का केली हा मला पडलेला प्रश्न आहे. हा विरोधी पक्षाचा दुटप्पीपणा आहे.

गेल्या नऊ महिन्यात अनेकवळा महापालिकेची सभागृहातच मुख्य सर्वसाधारण सभा घेण्याची परवानगी मागितली होती पण ती दिली गेली नाही. त्यावेळी सहकारी पक्षाच्या नगरसेवकांकडून काहीही सहकार्य केले गेले नाही. राज्यात तुमचे सरकार असताना ज्या त्या पक्षनेत्यांकडे कोणीही पाठपुरावा केला नाही. आम्हाला प्रामाणिकपणे जीबी चालवायची आहे. त्यामुळे आजची खास जीबीची जाहीरात अन्य तांत्रिक प्रक्रिया केल्यामुळे जीबी घेतली गेली. त्यामुळे या पुढे राज्य नगरविकास विभागाकडून ऑफलाइन जीबी घेण्याचे लेखी आदेश येत नाहीत तो पर्यंत आम्ही ऑनलाइन जीबी घेणार आहोत, असे ठामपणे सांंगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.