Pune News : पुण्यात परिवहन आयुक्तांचं पुणेरी पगडी घालून स्वागत

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात भेट दिली. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि रिक्षा चालक मालक व विविध संघटनांच्या वतीने त्यांचे पुणेरी पगडी घालून स्वागत केलं.

यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे शहराध्यक्ष जफर कादरी, कार्याध्यक्ष शफिक पटेल, उपाध्यक्ष हर्षदा अन्सारी, वरीष्ठउपाध्यक्ष मोहम्मद शेख, कोषाध्यक्ष सुहास कदम, पुणे रिक्षा फेडरेशनचे प्रदीप भालेराव, शिवसेनेचे एकनाथ ढोले, गोरख पोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

विश्रांतवाडी येथे रिक्षा पासिंग साठी ट्रँक सुरू करण्यात यावा, रिक्षाचालकांना ऑनलाईन मध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यात याव्यात, बोगस इन्शुरन्स होणाऱ्या प्रकाराबद्दल कारवाई व्हावी यासारख्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली. विश्रांतवाडी येथील रिक्षा पासिंग ट्रँक सुरू करण्याचे अविनाश ढाकणे यांनी आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

कोरोना काळात रिक्षा चालक मालक यांच्या प्रचंड हाल झाले, याकाळात रिक्षा व्यवसाय बंद होता यामुळे रिक्षाचालकांना भरपाई म्हणून प्रत्येक महिना दहा हजार रुपये मिळावे अशी मागणी केली. बाबा कांबळे यांनी याबाबतचे निवेदन आयुक्तांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.