Pune : हेल्मेट सक्तीसंदर्भातील पोलिसांच्या कारवाईला शहरी भागात स्थगिती

मुख्यंमंत्र्यांनी दिल्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना; आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नांना यश

एमपीसी न्यूज – पुणे शहरात पुणे पोलिसांच्या वतीने हेल्मेटसक्ती स्थगित करण्यात आली आहे. या संदर्भात स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना सूचना केल्यानंतर आता शहरी भागात दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नसल्यास होणा-या कारवाईला स्थगिती मिळाली आहे. यासंदर्भात शहरातील आमदारांनी माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्त्वाखाली आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सूचना दिल्या, असे सांगण्यात आले आहे.

याबाबात अधिक माहिती देताना आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, पुण्यात शहरी भागात पुणे पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट सक्तीकरिता वाहनचालकांवर होणाऱ्या कडक कारवाईबाबत व दंड वसुलीबाबत नागरिकांमध्ये असंतोष होता. हेच लक्षात घेत आज आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रश्नाला वाचा फोडली.

  • याबरोबरच विनाहेल्मेट वाहनचालकांवर पोलिस करित असलेली दंडात्मक कारवाई, परवाना ताब्यात घेणे व पोलिसांची अरेरावी याबाबत भूमिका देखील मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांना पुण्यात शहरी व नागरी भागात हेल्मेट सक्ती स्थगित करण्याबाबतची आमची विनंती मान्य करीत पुणे पोलीस आयुक्तांना तात्काळ तशा सूचना दिल्या आहेत. यामुळे शहरी भागात हेल्मेटच्या प्रश्नाबाबत पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.