Pune : राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांकडून आफ्रिकन देशाला सॅनिटरी पॅड्स रवाना

एमपीसी न्यूज- आर्थिक मागास असलेल्या आफ्रिकेतील मालवी देशातील विद्यार्थिनींसाठी आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांकडून आफ्रिकन देशाला सॅनिटरी पॅड्स रवाना करण्यात आली . सॅनिटरी पॅड्स अभावी मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण या देशात कमी आहे.

आझम कॅम्पस येथे झालेल्या कार्यक्रमात ‘ग्लोबल फ्युचर्स नेटवर्क’ या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेकडे हे पॅड्स सुपूर्द करण्यात आले. यूनायटेड नेशन्सचे प्रतिनिधी डॉ. निहाल मयूर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .इशरत शेख,डॉ ज्योती सोनटक्के,सतीश खाडे यांनी मार्गदर्शन केले .
प्राचार्य डॉ शैला बूटवाला,मनसुरा मुलाणी ,शबाना शेख, डॉ. राहुल मोरे, उझ्मा सरखोत, प्रा रईसा शेख, तस्नीम सय्यद तसेच दरनान शेख, अदनान परसा हे विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. हा​ कार्यक्रम गुरुवारी झाला .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.