Pune : येरवडा कारागृहातून पळालेल्या कैद्यांपैकी एकाला दौंडमध्ये अटक

One of the escaped prisoners from Yerawada jail was arrested in Daund : पुणे ते दौंड हे 78 किलोमीटरचे अंतर पायी कापले

एमपीसीन्यूज :   येरवडा कारागृहातून गुरुवारी (16 जुलै) पाच कैदी खिडकीचे गज कडून पळून गेले होते. यापैकी एका कैद्याला पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले आहे.

गणेश आदिनाथ चव्हाण, असे या कैद्याचे नाव आहे. चव्हाण हा खून आणि दरोडा प्रकरणातील आरोपी आहे.

येरवडा कारागृहातून गुरुवारी (16 जुलै) पाच कैदी खिडकीचे गज कडून पळून गेले होते. अजिंक्य कांबळे, गणेश चव्हाण, अक्षय चव्हाण, देवगन चव्हाण आणि सनी पिंटो अशी त्यांची नावे आहेत. यापैकी एका कैद्याला पकडण्यात दौंड पोलिसांना यश आहे.

दौंड तालुक्यातील मेरगळवाडी परिसरात पोलिसांनी पाठलाग करून चव्हाणला पोलिसांनी अटक केली. येरवडा कारागृहातून पळ काढल्यानंतर त्याने पुणे ते दौंड हे 78 किलोमीटरचे अंतर पायी कापले होते.

कैदी  चव्हाण हा पहाटेच्या सुमारास मेरगळवाडी परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याचा शोध घेण्यासाठी दौंड पोलिसांची तीन पथके नेमली होती.

मेरगळवाडी परिसरातील एका डोंगरात तो लपून बसला होता. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.