Pune : पुणे विभागातील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या प्रमाणात 24 तासात एक टक्क्याने वाढ

One per cent increase in corona release in Pune division in 24 hours

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रविवारच्या आकडेवारीनुसार विभागात 68.12 टक्के रुग्ण बरे झाले होते. तर सोमवारी रात्री आलेल्या आकडेवारीनुसार हे प्रमाण सुमारे एक टक्क्याने वाढून 69.07 टक्के झाले आहे. ही नागरिकांसाठी दिलासादायक बाब आहे.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत माहिती दिली आहे, पुणे विभागातील 98 हजार 618 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 42 हजार 779 झाली आहे.

तर ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 475 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 686 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.58 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 69.07 टक्के आहे.

सोमवारी (दि. 10) रात्री नऊ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 17 हजार 463 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 42 हजार 779 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 253 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 806 , सातारा जिल्ह्यात 115, सोलापूर जिल्ह्यात 399, सांगली जिल्ह्यात 271 तर कोल्हापूर जिल्ह्यात 662 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 10 हजार 87 रुग्णांपैकी 82 हजार 432 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 25 हजार 145 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 510 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.88 टक्के आहे.

सातारा जिल्हा – सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 5 हजार 765 रुग्णांपैकी 2 हजार 753 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 832 आहे. कोरोनाबाधित एकूण 180 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 हजार 324 रुग्णांपैकी 7 हजार 268 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 494 आहे. कोरोनाबाधित एकूण 562 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 हजार 776 रुग्णांपैकी 1 हजार 562 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 70 आहे. कोरोनाबाधित एकूण 144 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 10 हजार 827 रुग्णांपैकी 4 हजार 603 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 934 आहे. कोरोनाबाधित एकूण 290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.