pune : ससूनमध्ये आज अवघे 8 कोरोना पॉझिटिव्ह; 4 मृत्यू, एकाला डिस्चार्ज

0

एमपीसीन्यूज : पुणे शहरातील ससून रुग्णालयात आज शनिवारी 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली.

ससून रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण आजही कायम राहिले. आज मृत्यू झालेल्या चार रुग्णांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुष रुग्णांचा समावेश होता.

यामध्ये येरवडा येथील 65  वर्षीय आणि हडपसर येथील 67  वर्षीय महिलेचा समावेश होता. तसेच शुक्रवार पेठ आणि गंज पेठेतील अनुक्रमे 52  आणि 51  वर्षीय पुरुषाचा समावेश होता. या रुग्णांना कोरोनासह अन्य गंभीर आजार होते.

दरम्यान, आज एकूण 210  संशयित रुग्णांचे वैद्यकीय अहवाल तपासणी पाठविण्यात आले. त्यापैकी अवघे 8 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत आज कमालीची घट झाली,  ही ससून रुग्णालयासाठी समाधानाची बाब आहे.

या रुग्णालयात कोरोनाबाधित म्हणून उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा अहवाल आज निगेटिव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एकूण 131 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

सध्या ससूनमध्ये प्रकृती गंभीर असलेल्या 9 रुग्णांवर व्हेंटिलेटरवर, तर 23  रुग्णांवर व्हेंटिलेटरशिवाय उपचार सुरु आहेत. दरम्यान, आज चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 132  रुग्णांचा कोरोनामुळे या रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like