Pune : मुसळधार पाऊस पडूनही पुण्यात रस्त्यांवर फक्त आठच खड्डे ?

एमपीसी न्यूज- शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो आणि स्पॉटची माहिती पाठवण्याचे महापालिकेने आवाहन केले होते. त्यावर गेल्या पंधरा दिवसांत खड्ड्यांच्या केवळ आठच तक्रारी आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर फक्त आठच खड्डे आहेत का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

महापालिकेच्या पथ, ड्रेनेज, आपत्कालिन व्यवस्थापन आणि अन्य खात्याचे विभाग प्रमुख, अधिकारी यांच्यासह वाहतूक पोलीस यांचा एक व्हाट्सऍप ग्रुप बनवण्यात आला आहे. तो नंबरही डिस्प्ले करण्यात आला आहे. तसेच प्रशासनाने अन्य व्हाट्सऍप नंबरही दिले आहेत. खड्डे दिसल्यास नमूद मोबाईलवर ठिकाण आणि खड्ड्यांचे फोटो पाठवण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. मात्र गेल्या 15 दिवसांत यावर केवळ आठच तक्रारी आल्या असल्याचे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.