Pune : सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने ‘सुपर सनी विक’चे आयोजन; विविध क्रीडा प्रकारांच्या जिल्हास्तरीय स्पर्धा

एमपीसी न्यूज – नगरसेवक सनीविनायक निम्हण (Pune) यांच्या वाढदिवसानिमित्त 17 ते 25 फेब्रुवारी दरम्यान सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने ‘सुपर सनी विक’चे आयोजन करण्यात आले आहे. या वीकमध्ये क्रीडाक्षेत्राला व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध खेळांच्या स्पर्धा भरवल्या जाणार आहेत.

तायक्वांदो, स्केटींग, बॉक्सिंग, पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फार अमृतकाल आणि भव्य डे – नाईट टेनिस बॉल क्रिकेट जिल्हास्तर अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोमेश्वर फाउंडेशनचे उमेश वाघ आणि प्रताप जाधव यांनी दिली.

बॉक्सिंगच्या स्पर्धा 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान होणार असून या स्पर्धांमध्ये आजपर्यंत 227 स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे. त्यापैकी 96 मुलींनी सहभाग नोंदवला असून जिल्हा पातळीवर हा एक विक्रम आहे. या स्पर्धा मुले आणि मुलींसाठी सब ज्युनिअर, ज्युनिअर, युथ आणि सिनीअर या वयोगट / वजनगटात घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बॉक्सिंग असोसिएसनचे सचिव मदन वाणी यांनी दिली.

या स्पर्धेत राज्य आणि राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला असून स्पर्धेसाठी गोखले नगर येथील शहिद तुकाराम ओंबाळे मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रींग उभारण्यात येणार आहे. स्पर्धा रोज दुपारी 2 वाजल्यापासून सुरु होतील. स्पर्धकांची वजने व मेडकील 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 10 दरम्यान स्पर्धेठिकाणी होतील.

स्पर्धा मधील विजेत्या खेळाडूंना मेडल, प्रशस्तीपत्र तसेच सांघिक विजेत्या व उपविजेत्या संघांना रोख पारितोषिके आणि चषक देण्यात येतील. स्पर्धेमधील सर्व सहभागी स्पर्धकांना मेडल आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा प्रकाशझोतात खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेच्या प्रवेशिका 16 फेब्रुवारी पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा शनिवार आणि रविवार दि. 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी हॉटेल सेंट्रल पार्क येथील भव्य हॉल मध्ये होणार असल्याची माहिती पुणे तायक्वांदो ऑर्गनायझेसनचे अध्यक्ष मिलींद पठारे यांनी दिली. मुले आणि मुलींसाठी सब ज्युनिअर, कॅडेट आणि ज्युनियर या वयोगटात एकूण 38 वजनीगटात या स्पर्धा होणार असल्याची माहिती स्पर्धासंचालक प्रविण बोरसे यांनी दिली.

स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंना मेडल, प्रशस्तिपत्र आणि रोख पारितोषिके देण्यात येतील तसेच सर्वसाधारण विजेत्या व उपविजेत्या संघास आकर्षक चषक देण्यात येतील. स्पर्धेमधील सर्व सहभागी स्पर्धकांना मेडल आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत. या स्पर्धेमध्ये आजपर्यंत 500 हुन अधिक खेळाडूंनी नांव नोंदणी केली आहे. जिल्हा स्तरावरील या स्पर्धा प्रथमच संपूर्णपणे ESS (इलेक्ट्रॉनिक स्कोअरिंग सिस्टीम) द्वारे आणि ऑक्टोगन मॅटवर घेण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या प्रवेशिका 22 फेब्रुवारी पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

स्केटींग स्पर्धा रविवार 25 फेब्रुवारी रोजी रोडरेस प्रकारात (Pune) होणार असल्याची माहिती स्केटींग असोसिएशन ऑफ पुणेचे सचिव अशोक गुंजाळ यांनी दिली. या स्पर्धा कॅडेट, सब ज्युनिअर, ज्युनियर आणि सिनीयर या वयोगटात मुले आणि मुलींसाठी होतील. इनलाईन, क्वॉड, रिक्रिएशन इनलाईन व बिगिनर्स प्रकारात स्पर्धा होतील. स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंना मेडल, प्रशस्तिपत्र देण्यात येतील तसेचसर्वसाधारण विजेत्या व उपविजेत्या संघास आकर्षक चषक देण्यात येतील. या स्पर्धेत आजपर्यंत 300 हुन अधिक खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला असून या स्पर्धेमध्ये आतापर्यंत प्रचिती लगड, श्रेया महाजन, संचित गावडे, रीहान बाफना, शर्व वाळके, शिवाय महाजान व श्लोक भेलके या राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंनी आपल्या प्रवेश निश्चित केला आहे.या स्पर्धेच्या प्रवेशिका 23 फेब्रुवारी पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

Pune : डॉ. सायरस पूनावाला यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा – शरद पवार

सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने भव्य डे नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा औंध येथील इंदीरा गांधी प्राथमिक शाळा मैदानावर दिनांक 20 ते 25 फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. पहिल्या चार विजेत्या संघांना एकूण रुपये 85 हजार 555 ची रोख पारितोषिके आणि चषक देण्यात येण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या प्रवेशीक 18 फेब्रुवारी पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

पुणे जिल्हा हौशी अथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने विविध अंतराच्या “पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फार अमृतकाल”स्पर्धा रविवारदिनांक 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 21, 10, 5 आणि 3 किमी अंतराच्या या स्पर्धा होतील. शिक्षणाचे माहेरघर पुणे आणि औद्योगिक क्रांतीचे पिंपरी चिंचवड या दोन ऐतिहासिक शहरामध्ये समन्वय साधण्याच्या उद्देशाने / विचाराने प्रथमच“पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फार अमृतकाल” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामधून या स्पर्धेस सकाळी 5.30 वाजता सुरुवात होणार आहे.

आत्तापर्यंत विक्रमी 21 हजार हुन अधिक नागरिकांनी या स्पर्धेमधील आपला सहभाग निश्चित केला आहे. स्पर्धेमधील सर्व वयोगटामधील पुरुष व महिला विजेत्या स्पर्धकांनाएकूण रुपये 5 लाख 55 हजार 555 रुपयांची बक्षिसे व पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेमधील सर्व सहभागी खेळाडूंना मेडल्स, प्रशस्तिपत्रदेण्यात येणार आहे.

इच्छुंकाना स्पर्धेत नाव नोंदणीसाठी www.sunnynimhan.com या वेबसाईटवर नोंदणी करता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.