PUNE PCMC RTE Admission : येत्या गुरूवार पर्यंत आरटीई प्रवेश घेता येणार !

एमपीसी न्यूज – शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना येत्या गुरुवारपर्यंत (ता. 29) प्रवेश घेता येणार आहे.

आरटीईची पहिली सोडत मार्चमध्ये काढण्यात आली होती. मात्र त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर ही प्रक्रिया काही महिन्यांपूर्वी पुन्हा सुरू करण्यात आली. त्यानुसार पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत राबविण्यात आली.

त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यातील प्रतीक्षा यादीत 24 हजार 980 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यापैकी आठ हजार 480 विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत निश्‍चित झाले आहेत. तर आठ हजार 176 विद्यार्थ्यांचे प्रोव्हिजनल प्रवेश झाले आहेत.

महत्त्वाची सूचना :
– रिक्त जागांनुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाची तारीख कळविली जाईल
– पालकांनी आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख अर्ज क्रमांक टाकून पाहावे
– शाळेत प्रवेशासाठी पालकांनी गर्दी करू नये
– बालकांना शाळेत घेऊन जाऊ नये
– आवश्‍यक मूळ कागदपत्रे आणि कागदपत्रांच्या छायांकित प्रती घेऊन जावे
– पोर्टलवरुन हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे

प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची सद्यःस्थिती :
जिल्हा : निवड झालेले विद्यार्थी : प्रोव्हिजनल प्रवेश : निश्‍चित प्रवेश
पुणे : 4,765 : 1,885 : 1,624
नगर : 803 : 335 : 368
नाशिक : 1,360 : 480 : 432
सोलापूर : 446 : 212 : 202
ठाणे : 1,912 : 492 : 757
औरंगाबाद : 1,539 : 292 : 395
नागपूर : 1,780 : 756 : 431
कोल्हापूर : 270 : 89 : 128

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.