-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune : लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनलच्या ‘प्रदूषण विरहित गणेशविसर्जन’ उपक्रमाला भाविकांचा प्रतिसाद

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज :’गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा आर्जवाबरोबरच त्याचे विसर्जन प्रदूषण विरहित व्हावे, यासाठी द लायन्स क्लब्स ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 संस्थेच्या वतीने ‘प्रदूषण विरहित विसर्जनाचा श्रीगणेशा’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमाचे उद्घाटन ओमप्रकाश पेठे, अभय शास्त्री यांच्या हस्ते झाले. यावेळी सागर भोईटे, अनिल मंद्रुपकर, योगेश कदम यांच्यासह लायन्स क्लबचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यावरणाची हानी आणि नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 32 लायन्स क्लब एकत्रित आले व त्यांनी गणेशभक्तांना मूर्ती विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत गणेशभक्तांनी मूर्तींचे दान केले. या उपक्रमात छोट्या-मोठ्या मिळून एकूण 2200 गणेशमूर्ती व साडेसात टन निर्माल्य संकलित करण्यात आल्याची माहिती लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या जलप्रदूषण विभागाचे जिल्हाध्यक्ष किशोर मोहोळकर यांनी दिली.

किशोर मोहोळकर म्हणाले, “प्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील भिडे पूल, राजाराम पूल, निलायम टॉकीज, नटेश्वर विविध घाटांवर 32 क्लबमधील साधारणपणे 3000 सदस्यांनी, विद्यार्थ्यांनी भाग घेतला.घरच्या घरी मूर्ती विसर्जन करण्यासह मूर्तीदानाचे आवाहन करण्यात आले होते.

त्यासाठी अमोनियम बायकार्बोनेटचे (खाण्याचा सोडा) वाटप केले. त्यात 2000 पेक्षा अधिक मूर्तींचे विसर्जन झाले. विसर्जनानंतर ही पावडर हौदात टाकण्यात आली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 2200 मूर्ती संकलित केल्या असून, त्या सर्व मूर्ती महाळुंगे येथील श्री फाऊंडेशनला, तर संकलित निर्माल्य कंपोस्ट खताच्या निर्मितीसाठी पाठवण्यात आले.

पोलिसांनी घेतला घरच्या जेवणाचा आस्वाद

लायन्स क्लबच्या वतीने गणेश विसर्जन काळात अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सकस आहार उपलब्ध करून देण्यात आला. लायन्स क्लबतर्फे उभारलेल्या या श्रमपरिहार केंद्रामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना घरच्यासारखे ताजे आणि पौष्टिक जेवण मिळाले.

याप्रसंगी लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, उपप्रांतपाल अभय शास्त्री, माजी प्रांतपाल फतेचंद रांका, लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागचे अध्यक्ष नितीन मेहता, सचिव अनिल सुगंधी, खजिनदार विक्रम ओसवाल, कल्पेश पटनी, प्रविण ओसवाल यांच्यासह लायन्स क्लबचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग आणि लायन्स क्लब पूना सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील रांका ज्वेलर्स येथे उभारलेल्या श्रमपरिहार केंद्राचे उद्घाटन श्रीकांत तरवडे यांच्या हस्ते झाले. गेल्या १५ वर्षांपासून हे श्रमपरिहार केंद्र उभारण्यात येते.या भोजनव्यवस्थेमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना, सुरक्षारक्षकांना आणि पोलीस मित्रांना बंदोबस्त करताना कुठलीही अडचण भासत नाही, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी केले.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn