Pune : बेवारस वाहने चार दिवसात घेऊन जाण्याचे पोलिसांकडून आवाहन

वाहने न नेल्यास होणार लिलाव : Police appeal to remove unattended vehicles in four days

एमपीसी न्यूज – पुणे शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने 173 बेवारस वाहने जप्त केली आहेत. ही बेवारस वाहने वाहतूक शाखा, पोलीस उपायुक्त कार्यालयात एअरपोर्ट रोड, पुणे येथे लावण्यात आली आहेत. नागरिकांनी आपापली वाहने ओळखून कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ती घेऊन जाण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. वाहने न नेल्यास लिलाव करण्यात येणार आहे.

पुणे शहर वाहतूक शाखेने 173 बेवारस वाहने जप्त केली आहेत. जमा केलेली वाहने पोलीस उपआयुक्त कार्यालय, वाहतुक शाखा, एअरपोर्ट रोड, पुणे येथे लावण्यात आली आहेत.

ज्या नागरिकांची ही वाहने आहेत, त्यांनी पुढील चार दिवसात येऊन कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्यांची वाहने घेऊन जावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील चार दिवसात वाहने न नेल्यास पोलिसांकडून बेवारस वाहने म्हणून त्यांचा लिलाव करण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.