Pune : पोलीस कर्मचारी सद्दाम शेख यांचा सत्कार

आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचे वाचवले प्राण

एमपीसी न्यूज- जांभुळवाडी येथील तलावामध्ये उडी घेऊन एका तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या तरुणीचे प्राण वाचविणारे वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सद्दाम शेख यांचा सत्कार छावा स्वराज्य सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. पोलीस कर्मचारी सद्दाम शेख यांनी प्रसंगावधान राखत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तलावात उडी मारुन त्या युवतीचे प्राण वाचवले.

छावा स्वराज्य सेना महिला आघाडीतर्फे प्रदेशाध्यक्षा शीतल हुलावळे यांच्या हस्ते शेख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कदम, पोलीस कॉन्स्टेबल अमोल काटकर, छावा स्वराज्य सेनेच्या शहर अध्यक्षा मेघाताई कदम, शहर अध्यक्षा (क्रीडा विभाग) अश्विनी तारू, निर्मला रायरीकर, अध्यक्षा कोथरूड मतदार संघ, जयश्री बांदल, पुनम येळवंडे, वैभवी चौधरी हे सदस्य व सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.