Pune : पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकास 15 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले रंगेहाथ

एमपीसी न्यूज : पुण्यातील (Pune) विश्रामबाग पोलिस स्टेशनमधील उपनिरीक्षक शंकर धोंडिबा कुंभारे यांना 15 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

Chinchwad : संतोषी मा महिला भजनी मंडळाला पहिले पारितोषिक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही जर 50 हजार रुपये दिले.तर एका प्रकरणामध्ये तुमच्यावर गुन्हा दाखल करणार नाही. अशी मागणी उपनिरीक्षक शंकर धोंडिबा कुंभारे यांनी फिर्यादीकडे केली. त्यावर फिर्यादी आणि आरोपी पोलीस यांच्यामध्ये पैसे किती द्यायचे. या संदर्भात चर्चा झाल्यावर 50 हजाराऐवजी 30 हजार देण्याचे ठरले. त्यानुसार आज 30 हजार रुपयांऐवजी 15 हजार देण्याचे ठरले.

या एकूण प्रकरणाबाबत फिर्यादी यांनी लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर आज सापळा रचून उपनिरीक्षक शंकर धोंडिबा कुंभारे यांना 15 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.