Chinchwad : संतोषी मा महिला भजनी मंडळाला पहिले पारितोषिक

एमपीसी न्यूज – कै.सोपानराव जयवंतराव भोईर यांच्या 18 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महिला भजन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी (दि. 31) पार पडला. या भजन स्पर्धेत 32 भजनी मंडळांनी सहभाग घेतला.

Nitin Desai : नितीन दादांनी बॉलीवूडमध्ये मराठी माणसाची मान उंचावली – डॉ. अमोल कोल्हे

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, माजी नगरसेवक सुरेश भोईर, राजभाऊ गोलांडे, आप्पा बागल, विठ्ठल काटे, गतीराम भोईर, दत्तात्रय साकोरे, किरण हर्षवर्धन भोईर, हभप नीलम शिंदे आदि उपस्थित होते.

भजन स्पर्धेत इंदिरानगर, चिंचवड (Chinchwad) येथील संतोषी मा महिला भजनी मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला, रस्टन कॉलनी चिंचवड येथील दत्त प्रासादिक महिला भजनी मंडळाने द्वितीय क्रमांक तर जोगेश्वरी महिला भजनी मंडळाने तृतीय क्रमांक मिळवला.

चिखली येथील शिवतेज महिला भजनी मंडळ, राधाकृष्ण महिला भजनी मंडळ तसेच सिद्धिविनायक महिला भजनी मंडळ, संभाजीनगर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले.

प्रथम पारितोषिक पाच हजार एक रुपये आणि स्मृतीचिन्ह, दुसरे पारितोषिक तीन हजार एक रुपये आणि स्मृतीचिन्ह, तिसरे पारितोषिक दोन हजार एक रुपये तर उत्तेजनार्थ पारितोषिक एक हजार एक रुपये आणि स्मृतीचिन्ह असे होते.

स्वरांजली महील भजनी मंडळातील कान्होपात्रा पवार यांना वैयक्तिक पखवाज वादक, जोगेश्वरी महिला भजनी मंडळातील कस्तुरी जमखंडी यांना हार्मोनियम वादक म्हणून तर रेणुका भजनी मंडळाच्या रामेश्वरी कुडाळकर यांना उत्कृष्ट गायक म्हणून प्रत्येकी 501 रुपये बक्षीस देण्यात आले.

सर्व मंडळांना सहभागी झाल्याबद्दल रोख एक हजार रुपये देण्यात आले. परीक्षक म्हणून हभप मधुकर महाराज मोरे आणि उमेश विठ्ठल पुरोहित यांनी परीक्षण केले.

प्रास्ताविक भाऊसाहेब भोईर यांनी केले. सूत्रसंचालन संतोष पाटील तर आभार नीलम शिंदे यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.