Talegaon Dabhade : देशभक्ती समूहगायन स्पर्धेत आदर्श विद्या मंदिरला पहिले पारितोषिक

एमपीसी न्यूज – देशभक्ती समूहगायन स्पर्धेत मावळ (Talegaon Dabhade) शिक्षण प्रतिष्ठान संचलित आदर्श विद्या मंदिरच्या माध्यमिक विभागातील दोन गटांना पारितोषिक मिळाले.आठवी ते दहावी गटाने शहरी विभागात प्रथम तर पाचवी ते सातवी विभागाने दुसरे पारितोषिक मिळवले. श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
 स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या देशभक्ती समूहगायन स्पर्धेत 8 वी ते 10 वी गटाने शहरी विभागात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.तर 5 वी ते 7 वी गटाने द्वितीय पारितोषिक मिळवले.दोन्ही गटांना रोख रक्कम,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

दोन्ही गटांनी अतिशय उत्कृष्ट सादरीकरण करून सर्वांची वाहवा मिळवली सुजाता डावखरे,मनीषा डावखर,प्रतिक्षा ढवळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रवीण ढवळे व चि.गंधार ढवळे यांनी संगीत साथ दिली.
मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार सुनील शेळके,उपाध्यक्ष कान्हू पडवळ,नंदकुमार काळोखे, सचिव यादवेंद्र खळदे,सहसचिव प्रा.वसंत पवार,खजिनदार नंदकुमार शेलार व इतर सर्व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक संतोष खामकर यांनी स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस (Talegaon Dabhade) शुभेच्छा दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.