Pune : अजित पवार यांचे कट्टर समर्थक प्रशांत जगताप यांनीच हटवला अजित पवारांचाच फोटो!

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या (Pune) पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या कार्यालयातील अजित पवारांचे फोटो हटवण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर पक्षात फोटोवरुनही वाद सुरू झाले आहेत. आता प्रशांत जगताप यांनी अजित पवार यांचे फोटो काढल्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे. 

राष्ट्रवादीत बंडखोरी होण्याआधी प्रशांत जगताप हे अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जायचे. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर प्रशांत जगताप हे शरद पवार गटात सहभागी झाले.

दरम्यान, वानवडी परिसरात प्रशांत जगताप यांचे पक्ष कार्यालय आहे. या पक्ष कार्यालयात यापूर्वी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार (Pune) यांचे फोटो होते. मात्र, जगताप यांनी आता आपल्या कार्यालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो हटवले आहेत.

Pimpri : पावसाळी अधिवेशनासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

जगताप यांनी नव्याने फोटो तयार करून घेत सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचेच फोटो सध्या आपल्या कार्यालयात लावले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.