Maval : रामदास काकडे यांनी तालुक्याचे नेतृत्व करावे – योगेश पारगे

एमपीसी न्यूज – रामदास काकडे यांनी तालुक्याचे नेतृत्व करावे, अशी (Maval) अपेक्षा जनसेवा विकास समितीचे संघटक योगेश पारगे यांनी व्यक्त केली. रामदास काकडे यांनी नुकताच काँग्रेस (आय) पक्षामध्ये प्रवेशाचा निर्णय जाहीर केला. त्या निमित्ताने जनसेवा विकास समितीच्या वतीने रामदास काकडे यांचा सत्कार करण्यात आला.

जनसेवा विकास समितीचे कार्याध्यक्ष कल्पेश भगत, जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत तसेच नगरसेवक, रोहित लांघे, सुनील कारंडे, समीर दाभाडे, नीलेश पारगे, दत्तात्रय पारगे, दीपक कारके, किरण ढोरे, चंदन कारके, वैभव गवारे आदी उपस्थित होते.

Pune : अजित पवार यांचे कट्टर समर्थक प्रशांत जगताप यांनीच हटवला अजित पवारांचाच फोटो!

रामदास काकडे हे एक उच्चशिक्षित व संयमी नेतृत्व असून आज इंद्रायणी महाविद्यालयासारखी शिक्षण संस्था त्यांनी जागतिक दर्जाची अतिशय मेहनतीने बनवली आहे. तसेच कॅन्सर हॉस्पिटलमध्ये देखील त्यांचा फार मोठा हातभार लाभलेला आहे.

ब्रिटिशांना देखील लाजवेल, असा एमआयडीसीचा विकास रामदास काकडे (Maval) यांच्या हातून झालेला आहे. युवा निर्मिती करताना, तरुणांना रोजगार व व्यवसायाचे संधी उपलब्ध करून देण्याचे काम रामदास काकडे यांनी केलेले आहे.

त्यामुळे मावळ तालुक्याला एका विशिष्ट पद्धतीने घडवण्यासाठी रामदास काकडे यांनी तालुक्याचे नेतृत्व करण्याची गरज असल्याचे योगेश पारगे यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.