Chinchwad : सराईत गुन्हेगार आकाश राठोड टोळीवर मोक्का

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड, अहमदनगर आणि पुणे ग्रामीणमधील (Chinchwad) विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे 30 गुन्हे दाखल असलेल्या आकाश राठोड टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम 1999 (मोक्का) नुसार कारवाई केली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले आहेत.

टोळी प्रमुख आकाश वजीर राठोड (वय 23, रा. मुळशी), टोळीतील सदस्य बजरंग चतुर मारवाडी कुंभार (वय 29, रा. उरवडे, ता. मुळशी), आरमान प्रल्हाद नानावत (वय 22, रा. वडु खुर्द, ता. हवेली), रोहित मैनावत (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

Maval : रामदास काकडेंनी तालुक्याचे नेतृत्व करावे – योगेश पारगे

या आरोपींवर पिंपरी चिंचवड, अहमदनगर आणि पुणे ग्रामीणच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, जबरी चोरी असे एकूण 30 गुन्हे दाखल आहेत. टोळीमधील सर्व आरोपी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने ही (Chinchwad) कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपआयुक्त स्वप्ना गोरे, उपआयुक्त विवेक पाटील, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, मच्छिंद्र पंडीत, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, शरद विंचु यांच्या पथकाने केली आहे.

सन 2023 मध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील 19 संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण 200 आरोपीवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.