Maval : महिलेच्या डोक्यात कोयता घालून ठार मारण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – शेतात काम करत असलेल्या महिलेच्या (Maval) डोक्यात कोयत्याने वार करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी(दि.12) मावळ येथील आढले गावात घडली.

याप्रकरणी जखमी महिलेने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिरगाव पोलिसांनी ओंकार बाळू घोटकुले (वय23), बाळू सोनबा घोटकुले (वय50) दोघे राहणार आढले यांना अटक केली असून महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या जाऊबाई व सासूबाई सोबत शेतात काम करत होत्या. यावेळी आरोपी तेथे आले व त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ व दमदाटी करत भांडण सुरू केले.

Chinchwad : सराईत गुन्हेगार आकाश राठोड टोळीवर मोक्का

यावेळी महिला (Maval) आरोपीने तिच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार केला. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाल्या. यावरून पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून शिरगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.