Talegaon : मानव-सर्प संघर्ष टाळण्यासाठी तळेगाव येथे मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – पावसाळ्यात मानवी वस्त्यांमध्ये साप आढळण्याचे (Talegaon) प्रमाण वाढत आहे. पावसाळ्यात सर्पदंश टाळण्यासाठी तसेच मानव-सर्प संघर्ष टाळण्यासाठी वन्यजीव रक्षक मवाळ संस्थेच्या वतीने तळेगाव एमआयडीसी मधील बोर्ग वॉर्नर कंपनीत मार्गदर्शन सत्र राबविण्यात आले.

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सदस्य विकी दौंडकर, जिगर सोलंकी, आदेश मुथा यांनी कामगारांना मार्गदर्शन केले.

सर्प आणि इतर प्राण्यांबद्दल जनजागृती केली. मावळ तालुक्यात आढळणारे विषरी व बिनविषारी सापांचे प्रकार, त्यांना कसे ओळखावे, साप चावल्यावर करायचे प्राथमिक उपचार, साप आपल्या परिसरात येऊ नये यासाठी काय करावे, सापांचे आपल्यासाठी होणारे फायदे यावर चर्चा करण्यात आली. लोकांमध्ये असलेले गैरसमज देखील यावेळी दूर करण्यात आले.

मावळ परिसरात सुमारे 37 प्रकारचे साप आढळून येतात. त्यातले नाग, घोणस, मण्यार, फुरसे हे चार प्रकारचे साप मानव वस्तीमध्ये जास्त आढळतात. या सपांमुळे मावळ तालुक्यात आधिक प्रमाणात सर्पदंश होतात. आता पावसाळा सुरू झाला आहे. या काळात भरपूर सापांची पिल्लं आढळून येतात.

आपण काम करताना काळजी घेतली पाहिजे. पायात बुटांचा वापर केला पाहिजे, रात्रीच्या वेळी बाहेर जाताना टॉर्च वापरावा. परिसरात स्वच्छता ठेवावी. यामुळे मानव आणि सर्प संघर्ष कमी होऊ शकेल. सर्पदंश झाल्यावर त्वरित जवळ पासच्या दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला देखील यावेळी देण्यात आला.

Maval : महिलेच्या डोक्यात कोयता घालून ठार मारण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

कोणता ही वन्य प्राणी आम्ही मारणार नाही. अथवा त्याला इजा करणार नाही. आम्ही वन्य (Talegaon) प्राण्यांचे रक्षण करू असे आश्वासन कंपनीतील कामगारांकडून घेण्यात आले.

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी सांगितले की, मावळ तालुक्यात सापांचे प्रमाण खूप जास्त आहे. सर्वांनी काळजी घ्यायला हवी. शाळेत, कंपनीत, गावामध्ये साप आणि इतर वन्यजीव रक्षक मावळ संस्था (9822555004) अथवा वनविभागाशी संपर्क करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.