Pune : रास्तारोको करणाऱ्यांवर आता दाखल होणार गुन्हे !

एमपीसी न्यूज- पुणे जिल्ह्यात कुठेही रास्तारोको आंदोलन करणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल होणार आहेत. पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी याबाबतचे धोरण जाहीर केले असून याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आली आहे.

विविध प्रकारचे बंद करून सर्वसामान्य जनतेला तसेच प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या मोर्चेकऱ्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाखाली आता गुन्हे दाखल होणार आहेत. अशा प्रकारच्या रास्ता रोको आणि बंद करणाऱ्यांमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे प्रसंग उद्भवत असतात. जिल्ह्यातील वातावरण गढूळ होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अशा प्रकारची कारवाई करणे क्रमप्राप्त असून आपल्या मागण्या मांडण्यासाठी सर्वसामान्य जनतेला तसेच प्रशासनाला वेठीस न धरता अन्य संविधानिक मार्गांचा वापर मोर्चेकरी करू शकतात असेही पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.