Pune : धायरी फाटा येथे कचऱ्यात सापडले मृत अर्भक

एमपीसी न्यूज – धायरी फाटा येथील सणस शाळेजवळील मुख्य ( Pune) रस्त्यावर कचऱ्यात  आज (शुक्रवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नवजात मृत अर्भक सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, स्थानिकांच्या मदतीने अर्भक ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे.

Pune : सतारीवर झंकारला सायंकालीन ‘मारवा’ तर अंकिता जोशी यांच्या रंगतदार ‘मुलतानी’ ने रसिक मंत्रमुग्ध

सिंहगड रस्ता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. आज शुक्रवारी सकाळी आठच्या  सुमारास  सणस शाळेशेजारील कचराकुंडीजवळ नवजात अर्भक दिसले होते. अशी माहिती पुणे मनपाच्या कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी पंचनामा करून अर्भक ताब्यात घेतले ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.