Pune : पुण्यात डेंग्यूचा प्रादुर्भावात वाढ, सप्टेंबर महिन्यात 683 संशयीत रुग्ण

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत (पीएमसी) गेल्या महिन्यात डेंग्यू संसर्गाची सर्वाधिक प्रकरणे नोंदवण्यात ( Pune) आली असून आरोग्य अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. शहरातील रोगराई पसरवण्यासाठी जबाबदार असलेल्या विविध आस्थापनांवर कारवाई करूनही प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

Pune : बनावट स्वाक्षरी करुन सदनिकेवर पाच कोटी रुपयांचे तारण कर्ज काढत फसवणूक

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्यात शहरात डेंग्यूचे एकूण 70 पुष्टी आणि 683 संशयित रुग्ण आढळून आले होते, जे चालू वर्षातील आतापर्यंत एका महिन्यातील सर्वाधिक नोंदवले गेले होते. रोगराई पसरण्याला कारणीभूत ठरलेल्या अशा 174 आस्थापनांवर महापालिकेने गेल्या महिन्यात कारवाई केली असून उल्लंघन करणाऱ्यांकडून एकूण 18 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात ( Pune) आला आहे.

अधिका-यांच्या मते, दुसऱ्यांदा निदान झालेल्या रुग्णांची संख्या ही गंभीर चिंतेची बाब आहे कारण खासगी रुग्णालयांमध्ये नोंदवलेल्या अशा रुग्णांपैकी 10% पेक्षा जास्त रुग्ण हे चालू वर्षात दुसऱ्यांदा डेंग्यूचे निदान झालेले रुग्ण आहेत. डास उत्पत्तीची ठिकाणे शोधण्यासाठी नागरी संस्थेने यापूर्वीच सर्वेक्षण सुरू केले असून रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कारवाई करण्यात अपयशी ठरणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येत ( Pune)  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.