Pune : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानंतर ध्वनि पातळी ओलांडणाऱ्या आठ मंडळावर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – विसर्जन मिरवणुकीत ध्वनि पातळीची ( Pune ) मर्यादा ओलांडणारे मंडळे, तसेच ध्वनिवर्धक यंत्रणा पुरवठादारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. विसर्जन सोहळ्यात विविध मार्गांवरील सुमारे 70 ते 80 खटले ध्वनि मर्यादा तपासण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर संबंधित मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

Pune : पुण्यात डेंग्यूचा प्रादुर्भावात वाढ, सप्टेंबर महिन्यात 683 संशयीत रुग्ण

पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग, ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी आठ खटले दाखल केले. पुणे पोलिसांनी येरवडा, हडपसर, वानवडी, विमानतळ, चंदननगर, कोथरूड भागातील मंडळे, ध्वनियंत्रणा पुरवठादारांविरुद्ध आठ गुन्हे दाखल केले आहेत.

विसर्जन मिरवणूक, तसेच उत्सवाच्या कालावधीत उच्चक्षमतेची ध्वनिवर्धक वापरल्याने नागरिकांना त्रास झाला होता. याबाबत सामान्य नागरिक, तसेच विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर नाराजी व्यक्त केली होती. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली ( Pune ) होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.