Pune : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांना पदावरून बडतर्फ

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी (Pune) पाच दिवसापूर्वी शिंदे फडणवीस यांच्यासोबत जाऊन सरकारला पाठिंबा दर्शवित उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.त्या घटनेनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे.

शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांना आपण कोणत्या नेत्यासोबत जायचे हा प्रश्न पडला आहे.त्याच दरम्यान 2 जुलै रोजी झालेल्या शपथ विधी सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी हजेरी लावल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदीप गारटकर यांना पुणे जिल्हाध्यक्ष पदावरून बडतर्फ केले आहे.

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांची शिवसेना नेते पदी केली नियुक्ती

महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी 2 जुलै 2023 रोजी प्रदीप गारटकर उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे पक्षाच्या सदस्यत्वावरून व पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत असल्याचे पत्रक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढले आहे.

यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हय़ातील पदाधिकाऱ्यां मध्ये एकच खळबळ उडाली असून सोशल (Pune)  मीडियावर या बाबत चर्चा सुरू झाली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.