Pune : रूफ टॉप हॉटेल परवानगीला पुणे महापालिकेचा नकार, गुरुवारी बोलावली जिल्हा प्रशासन, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क यांची संयुक्त बैठक

एमपीसी न्यूज – इमारतीच्या गच्चीवर (Pune) बेकायदेशीरपणे रूफ टॉप हॉटेल थाटले जात असल्याने त्यास दारू विक्री व इतर परवानग्या मिळू नयेत यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी महापालिकेतर्फे जिल्हा प्रशासन, पोलिस, राज्य उत्पादन शुल्क यांच्यासोबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक गुरुवारी (दि.14) होणार आहे.

नागरिकांच्या आवाजाच्या तक्रारी तसेच हॉटेलमध्ये आग लागल्यास ग्राहकांना बाहेर पडण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेतर्फे अशा हॉटेलवर कारवाई करून शेड पाडून टाकले जात आहे. या बरोबरच या मिळकतीवर तीन पट कर लावला जात आहे.

Maratha Reservation : लढ्याला 100 टक्के यश येणार पण उपोषण मागे घ्या; भिडे गुरुजींचे मनोज जरांगे यांना आवाहन

बेकायदेशीर ठिकाणी हॉटेल सुरु केले जाऊ (Pune) नयेत अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. व्यावसायिकास हॉटेल व दारू विक्रीचा परवाना देण्यापूर्वी महापालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यावेअसेही महापालिकेने सांगितले होते.

याच पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेचा बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी आयोजित केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.