Pune : 24 तासात पुण्याचे तापमान पुन्हा घसरले, पारा 10.9 अंशावर

एमपीसी  न्यूज   पुण्याचे शनिवारी (दि.24) वाजेपर्यंत किमान तापमानाचा (Pune) पारा 12.8 अंश सेल्सिअस नोंदला होता. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत हे तापमान 10.9 अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले. चोवीस तासांमध्ये 1.9 अंश सेल्सिअसने किमान तापमान कमी झाल्याने हवेतील गारठा वाढला आहे.

शहरात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. या महिन्यात दुसऱ्यांदा किमान तापमानाचा पारा 10.9 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. शहर आणि परिसरात आज (सोमवारी) आकाश ढगाळ राहणार असल्याने थंडीचा कडाका कमी होऊन किमान तापमानाचा पारा पुन्हा उसळी घेईलअसा अंदाज हवामान खात्यातर्फे रविवारी वर्तविण्यात आला.

Ajit Pawar Letter : मला राजकारणात अपघाताने संधी मिळाली – अजित पवार

वेधशाळेत या महिन्याच्या पहिल्याच दिवशी किमान तापमान 10.9 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. त्यानंतर किमान तापमानाचा पारा सातत्याने वाढत गेला. पुणे शहरात वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आणि बंगालच्या उपसागरावरून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे शहराच्या परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे थंडीने शहरातून काढता पाय घेतला होता. 

मात्रउत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा हिमवर्षाव सुरू झाला आहे. तेथून थंड आणि कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावर होत आहे. राज्यातील पुण्यासह बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली घसरला असल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदण्यात आले (Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.