Pune : उत्तरेकडील शीत वाऱ्यांमुळे पुणेकरांना हुडहुडी : किमान तापमान झाले १०.८ अंश सेल्सिअस

Pune : पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज, बुधवारी पुण्यातील नीचांकी तापमान १०.९ अंश सेल्सिअस एवढे होते. थंडीची वाट पाहत असलेल्या पुणेकरांना मात्र ढगाळ हवामानामुळे ना धड ऊन, ना पाऊस अशा संमिश्र व रोगट हवामानात बरेच दिवस काढावे लागले. काही दिवस तापमानाचा चढ उतार सुरू होता, मात्र थंडी पडली, असे म्हणता येत नव्हते.

बुधवारी मात्र अतिशय थंड वाऱ्यासह किमान तापमान उतरून ते १०.८ अंश सेल्सिअस झाल्याने पुणेकरांना आपले उबदार कपडे, स्वेटर्स बाहेर काढावे लागले. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे व निरभ्र आकाशामुळे थंडी यापुढे आणखी वाढत जाणार असल्याचे संकेत दिसत आहेत, असे वेधशाळेने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.