Pune : घरबसल्या अभ्यासासाठी पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले ‘ई-कंटेन्ट’

एका क्लिकवर मिळणार व्हिडिओ, पीपीटी आणि पीडीएफ फाईल्स

एमपीसी न्यूज – लाॅकडाऊनमुळे घरात बसलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी ‘ई-कंटेन्ट’ उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना एका क्लिकवर व्हिडिओ, पीपीटी आणि पीडीएफ फाईल्स उपलब्ध होणार आहेत.

या ‘ई-कंटेन्ट’ पोर्टलवर 10 हजार पेक्षा अधिक व्हिडिओ, पीपीटी आणि पीडीएफ फाईल्स उपलब्ध आहेत. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, स्पर्धा परीक्षा, अभियांत्रिकी, व्यवस्थापन इत्यादी शाखांचे साहित्य अपलोड करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

http://econtent.unipune.ac.in या लिंकवर जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळवता येणार आहे. हे साहित्य उपलब्ध करण्यासाठी 25 ग्रंथपालांची टिम तयार करण्यात आली आहे.

या पोर्टलवर विद्यार्थ्यांना प्राध्यापकांनी तयार केलेल्या नोट्स, व्हिडिओ लेक्चर, पीडीएफ फाईल्स, पीपीटी, प्रोजेक्ट, प्रश्नसंच उपलब्ध होणार आहेत. 971 प्राध्यापकांचे 10 हजार पेक्षा जास्त साहित्य या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

आता लाॅकडाऊन असला किंवा परीक्षा जरी रद्द करण्यात आल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना घरबसल्या अभ्यास साहित्य उपलब्ध होणार आहे. प्रत्येक विषयांवर साहित्य उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.