_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune : खुनाच्या घटनांनी पुणे हादरले; भरदिवसा कोयत्याचे वार करुन दोघांच्या हत्या

Pune was shaken by the murders; They were killed by stabbing all day long:हडपसर आणि कोथरूड या ठिकाणी या घटना घडल्या.

एमपीसीन्यूज : शहरातील कोथरूड आणि हडपसर परिसरात दिवसाढवळ्या कोयत्याने वार करून दोघांचे निर्घृण खून करण्यात आले. हडपसर आणि कोथरूड या ठिकाणी या घटना घडल्या. पूर्ववैमनस्यातून हे खून झाले असावेत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, हडपसर आणि कोथरूड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

पहिला घटना हडपसर येथे घडली. आज, सोमवारी दुपारच्या सुमारास अज्ञात आरोपींनी चिकन विक्रेता आकाश लक्ष्‍मण भोसले (24) याच्यावर कोयत्याने सपासप वार केले.

त्यात गंभीर जखमी होऊन भोसले याचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.

_MPC_DIR_MPU_II

दुसरी खुनाची घटना कोथरूड परिसरात घडली. अज्ञात आरोपींनी एका गॅरेज चालकाच्या डोक्यात कोयत्याने वार करत त्याचा निर्घृण खून केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या खुनाची माहिती मिळताच कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

दिवसाढवळ्या घडलेल्या या खुनाच्या घटनांनी पुणे शहर हादरुन गेले. लॉकडाऊन मधून शिथिलता मिळाल्यानंतर शहरातील वेगवेगळ्या भागात खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.