Pune : पुण्याचा पारा पुन्हा घसरला, पुढील पाच दिवस थंडी कायम राहणार

एमपीसी न्यूज – पुण्याचे किमान तापमान दोन दिवसांपुर्वी (Pune ) तीन अंशानी वाढून 15 अंशावर गेले होते. यावेळी हवामान खात्याने तापमानात हळू हळू वाढ होईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र राज्यावर सध्या कोणतीही हवामान विषयक प्रणाली सक्रिय नाही. त्यामुळे राज्यभरात कोरडे वातावरण आहे. पुढील पाच दिवस उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गारठा कायम राहणार आहे. सध्या पुण्याचा पारा घसरून किमान तापमान 13.3 अंशांवर आला आहे. त्यामुळे हुडहुडी पुन्हा वाढली आहे.

Pune : बहिणी सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरुणाचा निर्घृण खून

राज्यावर सध्या हवामान विषयक कोणतीही प्रणाली सक्रिय नाही, त्यामुळे पुढील पाच दिवस उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव कायम राहणार असल्यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार आहे.

दक्षिण भारताकडून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे कोकण किनारपट्टी, दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहून रात्री किंवा पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान कोराना सारखे आजार पुन्हा डोके वर काढत असल्याने हवामान खाते व सरकारतर्फे ही नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहान केले ( Pune  ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.