Pune : मटणाची 61 लाख रुपयांची उधारी न देणाऱ्या हॉटेल चालकावर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – मटण विक्रेत्याची 61 लाख रुपयांची उधारी ( Pune ) देण्यास टाळाटाळ करणाऱ्या हॉटेल चालकावर  पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यात फसणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार 2019 ते 2023 या चार वर्षाच्या कालावधीत घडला आहे.

याबाबत कॅम्पातील मटण विक्रेत्याने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी हॉटेलचालक अफझल युसूफ बागवान (वय 65, रा. कोंढवा) आणि अहतेशाम अयाज बागवान (वय 35) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Pune : पुण्याचा पारा पुन्हा घसरला, पुढील पाच दिवस थंडी कायम राहणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर परिसरातील मटण मार्केटमधून या हॉटेलला दररोज मटण, चाप, खिमा, गुर्दा याचा पुरवठा केला जात होता. विक्रेत्याने या हॉटेलला 2019 ते 2023 या कालावधीत 2 कोटी 91 लाख 81 हजार रुपयांचा मटण पुरवठा केला.

हॉटेल चालकाने एकूण उधारीपैकी 2 कोटी 30 लाख 19 हजार रुपये परत केले. परंतु उर्वरित रक्कम 61 लाख 62 हजार रुपये देण्यास हॉटेलचालक टाळाटाळ करीत होता. त्यामुळे मटण विक्रेत्याने लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी हॉटेल चालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला ( Pune ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.