Pimpri : श्री साईनाथ बालक मंदिरतर्फे रविवारी 52 व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

एमपीसी न्यूज – श्री साईनाथ शिक्षण संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या ( Pimpri) श्री साईनाथ बालक मंदिरतर्फे रविवारी (दि.24) सकाळी साडेनऊ वाजता प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृह येथे 52 वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले आहे.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक महावीर सत्याण्णा व अश्विनी सत्याण्णा तर प्रमुख अतिथी म्हणून सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी कार्यक्रमात चिमुकले त्यांचे विविध गुणांचे प्रदर्शन करणार आहेत.

Pune : मटणाची 61 लाख रुपयांची उधारी न देणाऱ्या हॉटेल चालकावर फसवणुकीचा गुन्हा

पिंपरी-चिंचवड परिसरात शैक्षणिक क्षेत्रात मागील 52 वर्षांपासून प्री प्रायमरी स्कूल म्हणून श्री साईनाथ बालक मंदिर ही कार्यरत आहे. अभ्यासाबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी व पालकांचे प्रबोधन करून मुलांच्या विकासाचे ध्येय साध्य करणारी एकमेव श्री साईनाथ बालक मंदिर ही शाळा आहे.

ग्रंथ प्रदर्शन मातृ पूजन, 2 ऑक्टोबर स्वच्छता दिन, विद्यार्थ्यांच्या सहकार्याने स्वतःचे घर आणि परिसराची स्वच्छता करणे, विद्यार्थ्यांच्या सहभागाला महत्त्व शाळेत दिले ( Pimpri)  जाते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.