Delhi : साक्षी मलिक व विनेश फोगाट यांचा कुस्तीला रामराम

राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी बृजभूषण सिंह यांचे विश्वासू संजय सिंह यांची निवड झाल्याने घेतला निर्णय

एमपीसी न्यूज – आम्ही जिंकू शकलो नाही. पूर्ण भावनेने आम्ही (Delhi)  लढाई लढलो. पण महासंघाच्या अध्यक्षपदी बृजभूषणसारख्या व्यक्ती, त्यांचा सहकारी जिंकून येत असेल, तर मी माझ्या कुस्तीचा त्याग करते, यापुढे मी कुस्तीच्या मैदानात दिसणार नाही. देशवासियांना धन्यवाद! असे वक्तव्य करत साक्षी मलिकने कुस्तीला रामराम ठोकल्याचे घोषित केेले.

Pimpri : श्री साईनाथ बालक मंदिरतर्फे रविवारी 52 व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचे विश्वासू संजय सिंह यांची राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या  अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. संजय सिंह यांच्या पॅनेलला 40 मतं मिळाली, तर प्रतिस्पर्धी राष्ट्रीय खेळातील पदक विजेती अनिता श्योराण हिला फक्त सात मतं मिळाली. संजय सिंह यांची निवड झाल्यानंतर साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांनी कुस्तीला रामराम ठोकलाय, त्यांनी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय.

साक्षी मलिकसह आघाडीच्या कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता.   काही महिन्यांपूर्वी  ब्रिजभूषण यांच्या विरोधात ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी दिल्लीमध्ये मोठं आंदोलन केले होते. डब्ल्यूएफआयमधील बदलांसाठी त्यांनी आक्रमक प्रचार केला होता पण त्याला कुस्ती जगताचा पाठिंबा मिळाला (Delhi) नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.