Pune Railway : फेब्रुवारी महिन्यात 22 हजार फुकट्या प्रवाशांवर रेल्वेची कारवाई

एमपीसी न्यूज – विना तिकीट रेल्वेने प्रवास करणाऱ्या 22 हजार 182 फुकट्या प्रवाशांवर (Pune Railway) पुणे रेल्वे विभागाने फेब्रुवारी महिन्यात कारवाई केली आहे. या प्रवाशांकडून एक कोटी 75 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे

 

विना तिकीट प्रवास करणे तसेच सामान बुक न करता घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर कारवाईची मोहीम रेल्वेकडून सातत्याने सुरू असते. फेब्रुवारी महिन्यात तिकीट तपासणी दरम्यान 22 हजार 182 प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून रेल्वेने एक कोटी 75 लाख रुपये दंड वसूल केला. तसेच 8 हजार 392 प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी 49 लाख 98 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या 165 प्रवाशांकडून 18 हजार 250 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Sangvi : पिंपरी चिंचवड पोलिसांनी पकडले दोन कोटींचे एमडी ड्रग्स

 

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इन्दू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून (Pune Railway) अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.